पीएम किसानचा 13 वा हप्ता मिळण्यासाठी नविन नियम जाणून घ्या अन्यथा मिळणार नाहि हप्ता

पीएम किसानचा 13 वा हप्ता मिळण्यासाठी नविन नियम जाणून घ्या अन्यथा मिळणार नाहि हप्ता

 

देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसानचा (PM Kisan Yojana 2023) 13 वा हप्ता त्यांच्या खात्यात कधी येईल हे शेतकर्‍यांना जाणून घ्यायचे आहे. या संदर्भात सरकारकडून (Agriculture) कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये अ (Financial) असा दावा केला जात आहे की, 13वा हप्ता फेब्रुवारीमध्येच जारी केला जाऊ शकतो.


पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांना (Department of Agriculture) वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात, जे त्यांच्या खात्यात वर्षातून तीन वेळा 2-2 हजार रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात येतात. जर तुम्ही पीएम किसान (PM Kisan Update) योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी काही अनिवार्य अटी आहेत.

PM किसान योजनेच्या ((PM Kisan Yojana)13 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या PM किसान खात्याचे EKYC करावे लागेल. जर त्याने असे केले नाही तर त्याचा 13 वा हप्ता अडकू शकतो. PM किसान EKYC ऑनलाइन किंवा ऑफलाइन करता येते.

PM किसान eKYC ऑफलाइन करून घेण्यासाठी, तुम्हाला जवळच्या CSC केंद्रावर जावे लागेल, तर PM किसान eKYC PM किसानच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील करता येईल


या व्यतिरिक्त तुम्हाला जमीन पडताळणी देखील करावी लागेल. जर तुम्ही अद्याप जमीन पडताळणी केली नसेल तर यासाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. पीएम किसान योजनेअंतर्गत, वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान जारी केला जातो. त्यानंतर 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान दुसरा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर येतो आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान शेतकर्‍यांना प्राप्त होतो.