Police Bharti 2022 Maharashtra New Update पोलिस भरती जीआर आला लवकरच 11443 पदांसाठी भरती

Police Bharti 2022 Maharashtra New Update पोलिस भरती जीआर आला लवकरच 11443 पदांसाठी भरती

 





पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment 2022) कधी होणार? याकडे डोळे लावून बसलेल्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पाठीमागील दोन वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती (Police Recruitment) लवकरच राबवली जाणार आहे. राज्य पोलीस दलातील 20 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

यामुळे 20 हजार पोलीस शिपायांचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सद्यस्थितीत पोलीस दलातील 7 हजार 231 पदे भरण्याची कार्यवाही शासनाच्या मंजुरीमुळे सुरु झाली आहे. या व्यतिरिक्त 2021 मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण 11,443 पदे उपलब्ध झाली आहेत. 2020 आणि 2021 या वर्षातील रिक्त पदे एकत्रितरित्या भरण्याची कार्यवाही झाल्यास पद भरती यंत्रणेवरील ताणही कमी करता येईल, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

Maharashtra Police Bharti Online Form 2022 @ mahapolice.gov.in

  • महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची अधिसूचना येत्या काही दिवसात mahapolice.gov.in वर अपलोड केली जाईल.
  • त्यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्र पोलीस भारती ऑनलाइन फॉर्म 2022 भरण्यास सुरुवात करू शकता.
  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख अधिसूचनेत ऑनलाइन नमूद केली जाईल.
  • लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी तुम्ही तुमचा ऑनलाइन फॉर्म काळजीपूर्वक भरला पाहिजे.
  • तुम्ही अर्ज पोर्टलवर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्याची खात्री करा आणि त्यानंतरच तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.

Documents Required for Maharashtra Police Recruitment 2022 Application Form

  • Aadhar Card. (आधार कार्ड.
  • Residence Certificate. (निवास प्रमाणपत्र.)
  • 10th Marksheet. (10वी मार्कशीट.)
  • 12th Marksheet. (12वी मार्कशीट.)
  • Graduation Certificate. (पदवी प्रमाणपत्र.)
  • Computer Proficiency Certificate. (संगणक प्रवीणता प्रमाणपत्र.)
  • Character Certificate. (चारित्र्य प्रमाणपत्र.
  • Signature. (स्वाक्षरी.)
  • Photograph. (फोटो.

 

Police Recruitment 2022

  • दरम्यान, पोलीस भरती संदर्भात एक जाहीरात निघाली आहे. ही जाहीरात साडेसात ते आठ हजार पदांसाठी आहे.
  • आता नव्या भरतीबाबतही आम्ही लवकरच जाहीरात काढणार आहोत.
  • त्यामुळे राज्यातील तरुणांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, असे आम्हाला वाटते.
  • राज्यातील अधिकाधिक तरुण या भरतीसाठी प्रयत्न करतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
  • राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. हे तरुण चांगले शिक्षित आहेत.
  • अशा वेळी त्यांच्या हाताला काम नसल्याने ते बेकार असल्याचे पाहायला मिळते.
  • अशा वेळी जर पोलीस भरती निघाली तर अनेकांच्या हाताला काम आणि कुटुंबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे.
  • त्यामुळे राज्यातील जनतेसाठी ही भरती दिलासादायक असेल असे बोलले जात आहे.
  • दरम्यान, राज्यात महाविकासआघाडी सरकार असतानाच पोलीस भरतीसंदर्भात हालचाली झाल्या होत्या.
  • मात्र, नेमक्या वेळी राज्यावर कोरोना महामारीचे मोठे संकट आले.
  • परिणामी सर्व यंत्रणाच ठप्प झाली किंवा त्याला मर्यादा आल्या.
  • त्यामुळे पोलीस भरती रखडली.
  • कोरोना महामारी आली नसती तर राज्यात या आधीच पोलीस भरती झाली असते, असेही सांगितले जाते.

पोलिस भरती जीआर येथे पहा