खुशखबर, शेतकऱ्यांना ठिबक सिंचन जोडण्यासाठी 90 टक्के अनुदान, नवीन अर्ज सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज Good news, 90 percent subsidy for adding drip irrigation to farmers, new application form, apply online

खुशखबर, शेतकऱ्यांना ठिबक सिंचन जोडण्यासाठी 90 टक्के अनुदान, नवीन अर्ज सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज Good news, 90 percent subsidy for adding drip irrigation to farmers, new application form, apply online

 




नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी पोर्टल फार्मर या 

वेबसाईटवर ठिबक सिंचन योजनेचे नवीन अर्ज सुरू झाले 

आहेत. ठिबक सिंचन बरोबर तुम्ही तुषार सिंचन घेण्यासाठी ही 

अर्ज करू शकता. तुषार सिंचन घेण्यासाठी ही 90 टक्के 

अनुदान मिळते.

 

ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र

शेतकरी मित्रांनो सध्या ठिबक सिंचन खरेदी करण्यासाठी शासन आर्थिक सहाय्य देत आहे. महाराष्ट्र राज्य सर्व देशांमध्ये सिंचन साठी देशात एक नंबर ला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचे महत्त्व कळले आहे. शेतीमध्ये ठिबक सिंचन वापरल्याने पाण्याचा योग्य वापर होऊन शेतीचे उत्पन्न वाढते.  सरकार शेतकऱ्यांना ठिबक सिंचन खरेदीसाठी 90% पर्यंत अनुदान देत आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे.

 

शेतकरी मित्रांनो वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही 

महाडीबीटी पोर्टल फार्मर लॉगिन वर जाल येथे तुम्हाला 

शेतकऱ्यांचे प्रोफाइल बनवावे लागते. येथे तुमची सर्व 

वैयक्तिक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आणि 

ई-मेल आयडी टाकावा लागतो. युजर आयडी आणि 

पासवर्ड बनल्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉगिन करावे लागते. 

लॉगिन झाल्यानंतर तुम्ही आधार व्हेरिफिकेशन करू शकता. 

यासाठी तुम्हाला तिथे आधार नंबर टाकून ओटीपी घ्यायला 

लागतो. यानंतर शेतकऱ्याचा पत्ता आणि शेत जमिनीची 

माहिती टाकावी लागते यानंतर तुम्ही ठिबक सिंचन योजनेसाठी 

अर्ज करू शकता. ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करताना 

शासनाची फी फक्त 23 रुपये एवढी आहे. 

 

आवश्यक कागदपत्र

शेतकऱ्याचे आधार कार्ड

शेतकऱ्याचे बँक पासबुक

शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असावे. 

शेतीचा सातबारा आणि खाते उतारा

स्वयंघोषणापत्र आणि संयुक्त शेती असल्यास संयुक्त शेतकऱ्यांचे संमती पत्रे

 

ठिबक सिंचन शेतामध्ये बसवल्याने शेतीचे उत्पन्न वाढते 

पाण्याचा योग्य वापर होतो आणि पाण्याचा अपव्यय होत 

नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन आणि तुषार 

सिंचन यांचा शेतामध्ये वापर करावा आणि शेतीचे उत्पन्न 

वाढवावे. शासन ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन खरेदी 

करायला आर्थिक सहाय्यही देत आहे याचा सर्व शेतकऱ्यांनी 

फायदा घेतला पाहिजे.