गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजारापर्यंत शिष्यवृत्ती NMMS Scholarship Exam

गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजारापर्यंत शिष्यवृत्ती NMMS Scholarship Exam

 




राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS ) २०२२-२३

राज्यातील कोणत्याही माध्यमाच्या मान्यताप्राप्त शाळेतील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेतर्गत ( एनएमएमएस ) पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना यंदापासून पाच वर्षांसाठी तब्बल साठ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

तसेच परीक्षेसाठी यंदापासून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्न मर्यादेत सुमारे दोन लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या निर्णयाचे ग्रामीण भागातील पालकांनी स्वागत केले आहे

जातीनिहाय आरक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या अनेक कल्याणकारी शिष्यवृत्ती योजनांचा दरवर्षी लाभ मिळत असतो. परंतु ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशपातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रति वर्षासाठी बारा हजार याप्रमाणे चार वर्षांसाठी ४८ हजार रुपये मिळत होते.

यंदा एक वर्ष वाढल्याने त्यात बारा हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच याआधी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा दीड लाख रुपये होती. यंदा त्यात दोन लाखांनी वाढ झाल्याने साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना देखील ही शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे.

यंदा ही परीक्षा १८ डिसेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाइन अर्ज परिषदेच्या https://www. mscepune.in/ आणि https:// nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध आहेत. राज्यातील कोणत्याही शासकीय, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील आठवीमध्ये शिकणारे विद्यार्थी ही शिष्यवृत्ती परीक्षा देऊ शकतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने राज्यातील विविध केंद्रावर १८ डिसेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे. देश पातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्तीची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११ हजार ६८२ इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे.

मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली/महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याशिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यावर राहणार नसल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

दृष्टीक्षेपात 'एनएमएमएस' परीक्षा

* विद्यार्थ्यांना दरवर्षी बँक खात्यात मिळणार बारा हजार रुपये

* पाच वर्षांसाठी मिळणार शिष्यवृत्ती

* पालकांची उत्पन्न मर्यादा साडेतीन लाख रुपये

* शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेतून होणार

* परीक्षेसाठी विषय बौद्धिक क्षमता चाचणी ( ९० गुणांचे ९० प्रश्न )

* शालेय क्षमता चाचणी ( ९० गुणांचे ९० प्रश्न )

* मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगू व कन्नड अशा सात माध्यमातून देता येते परीक्षा

"राज्याच्या निर्धारित कोट्यानुसार संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. या परीक्षेचा निकाल साधारणतः फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल."

NMMS परीक्षा पात्रता | NMMS Exam Eligibility

  • 1.       महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीयशासनमान्य अनुदानितस्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.
  • 2.     पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
  • 3.     विद्यार्थी विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (SC / ST चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
  • 4.     खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.
  •  विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
  •  केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
  •  जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,
  •  शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचाभोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
  •  सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी


NMMS शुल्क | NMMS Fee

परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क अकारण्यात येते.







NMMS परीक्षेचे वेळापत्रक | NMMS Exam Timetable

महाराष्ट्रातील विविध केंद्रावरशिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.







दिनांक 10/10/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.