महाडीबीटी पोर्टल ऑनलाइन अर्ज सुरु "पोर्टल एक अर्ज अनेक"

महाडीबीटी पोर्टल ऑनलाइन अर्ज सुरु "पोर्टल एक अर्ज अनेक"

 




शेतकऱ्यांसाठी अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना सुरु – MahaDBT Portal Scheme 2022
शेतकरी बंधूंनो , सध्या ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे ; खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा 100% फायदा होणार.

कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजनाया सदराखाली सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारेदेण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून त्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज या पोर्टलवर करायचा आहे.

सर्व शेतकरी बांधवांना सूचना करण्यात येते की, कृषि यांत्रिकीकरण व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॉली, पॉवर टिलर, पॉवर विडर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, पेरणी यंत्र, सर्व पिकांचे लागवड यंत्र, चाफकटर, नांगर, फवारणी यंत्र, रिपर, जमीन सपाटीकरण यंत्र, खोडवा कटर, पाचट कट्टी यंत्र, मल्चर, मळणी यंत्र, डाळ मिल, सोलार ड्रायर, इतर विविध शेती औजारे, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, कांदाचाळ, शेडनेट, पॉलीहाऊस, रायपनिंग चेंबर, कोल्ड स्टोरेज, शेततळे अस्तरीकरण इ. बाबींचा अनुदानावर लाभ घेण्यासाठी आपले नजीकचे महा ई सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर, येथे किंवा ऑनलाईन महाडीबीटीया संकेतस्थळावर दि. २५ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत. महाडीबीटी पोर्टल वरील योजना प्रभावीपणे राबविणेसाठी राज्यशासनाने परिपत्रक जारी केले आहे.



शेतकऱ्यांसाठी अर्ज एक योजना अनेक”- महाडीबीटी पोर्टल वर विविध योजना:

फलोत्पादन योजने अंतर्गत:

·         कांदा चाळ 

·         पॅक हाऊस

·         जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन

·         फळबागांना आकार देणे

·         फळबाग लागवड 

·         मधुमक्षिकापालन

·         हरितगृह

·         शेडनेट हाऊस

·         प्लास्टिक मल्चिंग

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत

·         ट्रॅक्टर

·         ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे

·         प्रक्रिया संच

·         पावर टिलर

·         बैलचलित अवजारे

·         मनुष्य अवजारे

·         स्वयंचलित अवजारे

·         कल्टीवेटर

·         कापणी यंत्र

·         नांगर

·         पेरणी यंत्र

·         मल्चिंग यंत्र

·         मळणी यंत्र

·         रोटावेटर

·         वखर

 

आवश्यक कागदपत्रे

·         ७/१२ उतारा

·         ८ अ उतारा

·         बॅक पासबुक

·         आधारकार्ड

 


महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी  विविध योजना सुरु असतात. परंतु खूप कमी शेतकरी बांधवाना या योजनांचा लाभ मिळत असतो. अनेक शेतकरी बांधव केवळ माहिती नसल्यामुळे या शेतकरी सरकारी योजनांचा लाभ घेवू शकत नाहीत. शेतकरी अनुदान योजना किंवा महाराष्ट्र शासन कृषी योजना विषयी अधिक चांगल्या प्रकारे जागृती होणे गरजेचे आहे.

योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक.

शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

 

सूचना:

पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली असून यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज येथे करा