राज्यात लवकरच 20 हजार पोलिसांची भरती सुरु

राज्यात लवकरच 20 हजार पोलिसांची भरती सुरु

 





या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहेत. राज्यात लवकरच पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) करण्यात येणार आहे. ही मेगाभरती असणार आहे. तब्बल 20 हजार जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे सरकारी विशेष करुन पोलिसांत भरती (Government Job) होण्याचं स्वप्न असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. उपमुख्यंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत ठराविक काही दिवसांनी गृहमंत्र्यांची बैठक होत असते. या बैठकीत उच्चपदस्थ पोलीस अधिकारी असतात. फडणवीस यांच्यासह ही महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर फडणवीस यांनी 20 हजार पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणा केली. 

सायबर सुरक्षेवर अधिक भर

सध्या जमाना डीजीटलचा आहे. जवळपास सर्वच कामं ही ऑनलाईन पद्धतीने होतात. त्यामुळे सायबर सुरक्षेचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. आतापर्यंत अनेकांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. तसेच महत्त्वाचे कागदपत्र ही लीक होतात. त्यामुळे फडणवीस यांनी हा मुद्दा लक्षात घेत सायबर सुरक्षेवर अधिक भर देणार असल्याचं सांगितलं. तसेच या बैठकीत सायबर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत चर्चा झाली. सोबतच यासाठी एक मोहीम राबवणार आहोत, अशीही माहिती फडणवीस यांनी दिली.

आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक तरुण पोलीस भरती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे ? याची वाट पाहत होते. आपल्या महाराष्ट्र राज्यात चार ते पाच लाख तरुण या पोलीस भरती प्रक्रियेला सामोरे जाणार आहेत. यापूर्वी वर्ष 2019 मध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. आणि उर्वरित वीस हजार पोलिसांची भरती प्रक्रिया आता राबवण्यात येत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर आता ही भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. आणि ही भरती प्रक्रिया लवकर होण्याच्या दृष्टीने सुद्धा पावले उचलण्यात येत आहेत.

महाआयटी' च्या माध्यमातून उमेदवारांकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया 2022 (Police Bharti Maharashtra 2022) ही राबवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वर्ष 2020 आणि 2021 मधील रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यासाठी चा प्रस्ताव हा राज्य शासनाला प्राप्त झालेला आहे, आणि लवकरच शिंदे फडणवीस सरकार यासंबंधी ठोस निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. 2020 मध्ये असलेली रिक्त पदे यांची भरती सर्वात पहिल्यांदा पहिल्या टप्प्यांमध्ये होईल.

पोलीस भरती प्रक्रिया 2022(police bharti maharashtra 2022) महाराष्ट्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये शिपाई च्या 10,404 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, त्याचप्रमाणे चालक पदासाठी 1401 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल तसेच 722 पदे या भरती प्रक्रियेमध्ये शिपायाची असतील. पहिल्या टप्प्यातील पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात येईल. 

अशाप्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात पोलीस भरती प्रक्रिया 2022 ही राबवण्यात येत आहेत. ही माहिती इतरांना देखील शेअर करा. अशाच माहिती करिता आपल्या वेबसाईटवर भेट देत राहा.