महा ई सेवा केंद्र आँनलाईन अर्ज सूरू

महा ई सेवा केंद्र आँनलाईन अर्ज सूरू

 



केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामिण व नागरी भागात नागरीकांपर्यंत शासकिय, निमशासकिय व खाजगी सेवा पोहचविण्यासाठी तसेच सदर सेवेकरीता नागरीकांचा वेळ व श्रम वाचविण्याचे दृष्टीने राज्यात आपले सरकार सेवा केंद्र (MahaOnline) मंजुर करुन सदर बाबी सुलभरित्या होण्याकरीता वर्धा जिल्ह्यात एकुण 664 आपले सरकार सेवा केंद्र (MahaOnline) मंजुर करण्याची कार्यवाही अंमलात आणण्यात येत आहे. सर्व अर्जदारांनी खालीलप्रमाणे अटी/निकष पूर्णपणे वाचूनच अर्ज करावा, अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी

करीता सदर बाबत ईच्छुक अर्जदारांनी या जिल्ह्याकरीता अधिकृत संकेतस्थळ वर प्रसिद्ध करण्यात आलेली लिंकवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. २१ जून २०२२ पर्यंत सादर करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे

आपले सरकार सेवा (MAHAONLINE) केंद्र मंजुरीचे अटी/निकष : 

• अर्जदार यांना फक्त एका केंद्रासाठी अर्ज करता येईल.

• आपले सरकार सेवा केंद्र ज्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मंजुर करायचे आहे अर्जदार हा त्याच ग्रामपंचायतीचा रहेवासी असावा/असावी.

• अर्जदार हा बारावी (HSC) उत्तीर्ण असावा/असावी.

• अर्जदार हा संगणक परीक्षा (MSCIT) किंवा इतर शासनमान्य संगणक परीक्षा उत्तीर्ण असावा/असावी.

• अर्जदार यांच्या कुटुंबात यापुर्वी आपले सरकार सेवा केंद्र मंजुर (MahaOnline) नसावे.

• अर्जदार हा शासकीय कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी नसावा.

• अर्जदार हा CSC केंद्र किंवा इतर तत्सम डिजिटल सेवा केंद्र चालक असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

• शासकीय नियमाप्रमाणे अधिसूचित आरक्षण लागू राहील. (उदा. ३३% महिला, ५% अपंग)

• अर्जासोबत मागितलेले कागदपत्रे जोडताना कागदपत्रे हे PDF किंवा JPG/JPEG प्रकारचे असुन त्याची फाईल साईझ १ MB पर्यंत मर्यादित आहे, याची नोंद घ्यावी.

• महाराष्ट्र शासन (सा. प्र. वि.) यांचे शासन निर्णय क्रमांक, मातस-१७१६/प्र. क्र. ५१७/३९ दिनांक १९.०१.२०१८


अर्जासोबत जोडायचे आवश्यक कागदपत्रे


• आधार कार्ड

• मतदार कार्ड / मतदार यादी

• बारावीचे बोर्ड प्रमाणपत्र

• डोमिसाईल प्रमाणपत्र

• संगणक परीक्षा (MS-CIT ) किंवा इतर शासनमान्य संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

• PAN कार्ड

• इलेक्ट्रिक बिल

• CSC ID (असल्यास)

• मागील ६ महिन्याचे CSC B2C व्यवहार अहवाल (असल्यास)


लिंक : https://wardha.gov.in/en/notice/press-note-online-application-to-provide-aaple-sarkar-seva-kendra/

अर्ज करण्याची लिंक : http://forms.gle/7qMjwXLMY3sPU7TWA




माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा MahaOnline या जिल्ह्यात मिळणार ६६४ आपले सरकार सेवा केंद्र या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करा व अश्या प्रकारचे कामाचे लेख अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टेलेग्राम ग्रुपला सहभागी व्हा.