केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे आतापर्यंत 11 हप्ते झाले आहेत. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. हे सहा हजार 2000 चा एक हफ्ता याप्रमाणे तीन हफ्त्यात दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 हफ्ते शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. परंतु, अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत.
तुमच्याही खात्यात पैसे आले नसल्यास आता तुम्ही घरबसल्या पीएम किसान हेल्पलाइन क्रमांकवर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.
या नंबरवर संपर्क करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता :
पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011-23381092,23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109
ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in
दरम्यान, या योजनेसाठी eKYC करणे बंधनकारक आहे. जे शेतकरी eKYC करणार नाहीत, त्यांना पीएम किसानचा पुढील हप्ता मिळणार नाही. eKYC ची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. हे काम शेतकरी घरी बसून स्मार्टफोनच्या मदतीने करू शकतात. याशिवाय, ते कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक ईकेवायसी देखील करू शकतात.
