शेततळे अनुदान योजना अर्ज सुरु 52 कोटीचे अनुदान

शेततळे अनुदान योजना अर्ज सुरु 52 कोटीचे अनुदान

 



शेततळे अनुदान योजना अर्ज सुरु 52 कोटीचे अनुदान

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना शेततळे अनुदान योजना 2021 अंतर्गत लवकरच अनुदान मिळणार आहे. अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतामध्ये शेततळी खोदून ठेवलेले आहेत त्यापैकी अनेक शेतकऱ्यांना अद्याप कोणतेही अनुदान मिळालेले नाही. या संदर्भात कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी पाठपुरवा केल्यामुळे आता शेततळ्यांसाठी ५२ हजार कोटींचे अनुदान मिळणार आहेत.

शेततळ्याची गरज

पिकांना पाणी देण्यासाठी पूर्वी विहिरीनाचा उपयोग केला जात असायचा जो कि सध्या देखील केला जात आहे. पूर्वी ज्या विहिरी होत्या त्यांना मुबलक प्रमाणत पाणी होते याचे कारण त्यावेळी विहिरींची संख्या कमी होती व पाऊस पडण्याचे प्रमाण देखील जास्त होते.

आता विहिरींची संख्या वाढलेली असल्यामुळे शिवाय जमिनीतील पाणी पातळी खोल गेली असल्याने विहिरींना पाणी लागत नाही. अशावेळी शेततळे अनुदान योजना अंतर्गत शेततळे खोदले तर त्यामध्ये पाण्याची साठवणूक करून त्याचा उपयोग शेतीसाठी केला जाऊ शकतो.

शेततळे खोदकामासाठी येतो एवढाच खर्च विहिरीसाठी येवू शकतो.

शेततळे आणि विहीर यांची जर तुलना केली तर विहिर खोदकामासाठी जेवढा खर्च येते तेवढाच खर्च शेततळे खोदण्यास येवू शकतो. यामध्ये खर्चाचे प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकते पण सरासरी अंदाज काढला तर सारखाच येवू शकतो. विहिरीपेक्षा शेततळे असणे केंव्हाही फायद्याचे आहे कारण त्यामध्ये पाणी साठवून ठेवता येते आणि हवे तेंव्हा ते शेतातील पिकांसाठी देता येते.

शेततळे ऑनलाईन अर्ज १ पद्धत पोकरा योजना २ रोजगार हमी योजना आणि महाडीबीटी योजना

पोकरा योजना, रोजगार हमी योजना किंवा महाडीबीटी योजनेमधून शेतकरी शेततळे अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात. पोकरा आणि महाडीबीटी योजनेमधून जर शेततळ्याचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. रोजगार हमी योजना अंतर्गत शेत तळ्याचा लाभ घ्यायचा असेल तर यासंदर्भातील अर्ज ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतला करावा लागतो.

शेततळ्यासाठी महाडीबीटी वेब पोर्टलवर अर्ज करण्याची पद्धत.

महाडीबीटी वेब पोर्टलवर शेततळे अनुदान योजनेसाठी अर्ज करता येतो. या वेबपोर्टलवर शेततळे प्लास्टिक अस्तरीकरणसाठी देखील अर्ज करता येतो. तुम्हाला जर

असा करा शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज.

Ø गुगलच्या सर्च बार मध्ये टाईप करा mahadbt farmer login.

Ø कॉम्प्युटर स्क्रीनवर महा डीबीटी शेतकरी पोर्टल दिसेल त्या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.

Ø लॉगीन केल्यावर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.

Ø या ठिकाणी अनेक पर्याय दिसतील त्यापैकी सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा.

Ø शेततळ्याचा आकार व इतर बाबीविषयी योग्य माहिती निवडा.

Ø माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

Ø अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

Ø ज्या योजना निवडलेल्या आहेत त्या योजनांना प्राधान्य द्या.

Ø अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

Ø तुम्ही नवीन असाल तर make payment असा पर्याय येईल. त्यावर क्लिक करून पेमेंट करा.

Ø अर्जाची स्थिती व पोच पावती डाउनलोड करण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा.

Ø या ठिकाणी तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता त्याच बरोबरीने तुमच्या अर्जाची पोच पावती डाउनलोड करू शकता.