11 वी CET अर्ज नवीन अपडेट

11 वी CET अर्ज नवीन अपडेट

 


नवीन अपडेट नुसार 11th CET अर्ज 26/07/2021 ते 02/08/2021 पर्यंत भरता येणार. 

राज्यमंडळामार्फत सन २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा उत्तीर्ण /प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी


१)विद्यार्थ्याने प्रथम संगणक प्रणालीमध्ये स्वतःचा बैठक क्रमांक व आईचे नाव याबाबतची माहिती भरावी. सदर माहिती सादर (Submit) केल्यानंतर उर्वरित रकान्यातील माहिती आपोआप भरली जाईल. विद्यार्थ्याने दिलेल्या रकान्यात त्याचा ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास) भरावा.

२) विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करण्याचा विकल्प देण्यात आलेला आहे. इ. १० वीच्या परीक्षेचे माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठीचे माध्यम त्याने सदर रकान्यात निश्चित करावे. विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजीगणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापिसामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्रभूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास इ.१० वीच्या माध्यमानुसार उर्वरित अन्य ७ माध्यमांपैकी एक माध्यम निश्चित करावे लागेल.

३) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या/कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका/शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात येईलतो विद्यार्थ्यांनी निश्चित करावा. सदर परीक्षेला प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्याने निवडलेल्या तालुक्यासाठी/शहरी विभागासाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल.

४) उपरोक्तप्रमाणे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्र सादर (Submit) करावे. त्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्राची प्रिंट काढून जतन करुन ठेवावी.

५) उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

 

For students who have passed/appeared secondary school certificate (std x th) Examination from state board in the year 2021-


1) While filling the form, students must fill their seat number and mother’s name in the online system. Once they submit this, other details will be filled automatically. Students should provide their Email ID (If available) in the given space.

2) Students have been given the option of selecting the medium of examination. They can select the medium as per their ‘Std. X’ Examination and provide the information regarding medium for Examination in the given space. If student selects Semi English Medium option, the English, Mathematics and Science subjects will be in English medium. For social science (History and Political Science, Geography) the student has to select one medium out of 7 other mediums as per his/her ‘Std.Xth’ Examination.

3) Students must confirm the option of selecting District and Taluka for the examination centre as per the their temporary/permanent residential address. Considering the number of students appearing for the exams from that particular Tehsil (Taluka) the board will assign any one centre to the student.

4) After filling the information as per the instructions the student must submit the form. After the submission of their form students must take a printout and keep it safe

5) Students from this category are not required to pay the examination fees.


नवीन अपडेट


APPLY ONLINE