Police Bharti : पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज; अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' आहे शेटवची तारीख

Police Bharti : पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज; अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' आहे शेटवची तारीख

 





पोलीस भरतीची (Maharashtra Police Bharti) तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. या आधी अर्ज करण्यासाठीची मुदत ही 31 मार्च होती. त्यामध्ये आता वाढ होऊन इच्छुकांना 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. मराठा आरक्षणासाठी लागणारे एसईबीसी प्रमाणपत्र (SEBC Certificate) मिळण्यास विलंब होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळणेसाठी केलेल्या अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांच्याकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणं आवश्यक आहेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलीस भरती शैक्षणिक अर्हताः 


महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965 (सन 1965 चा महा. अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परिक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे


सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी उमेदवारांनी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.


1) SSC/HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र,


2) जन्म दाखला,


3) रहिवाशी प्रमाणपत्र,


4) जातीचे प्रमाणपत्र


5) जात-वैधता प्रमाणपत्र,


6) संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT),

7) खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती (शासन निर्णय दि.१७/३/२०१७ व दि. ११/०३/२०१९ प्रमाणे),


8) नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्रः (वि.जा-अ, भ.ज-ब, भ.ज-क, भ.ज-ड, विमाप्र, इमाव, एसईबीसी, इडब्लूएस प्रवर्गातील पुरूष व महिलांकरीता आरक्षीत असलेल्या पदांवरील निवडीकरीता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांचेबाबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय दि. ०४/०५/२०२३ मधील तरतूद क्र.४ नुसार),


9) माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, 4.10) गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, (जाहिरात दिनांकास १०९५ दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल),

10) गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, (जाहिरात दिनांकास १०९५ दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल),

11) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र,


12) भुकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र,


13) पोलीस पाल्य प्रमाणपत्र,


14) अनाथाबाबतचे प्रमाणपत्र,

15) अंशकालीन प्रमाणपत्र,


16) इ.डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र,


17) NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे.


एकूण पदे – 17,471

पदाचे नाव – पोलिस कॉन्स्टेबल

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

वेतन – 21,700/- ते 69,100/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2024

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन



आँनलाईन अर्ज करण्यासाठी  क्लिक करा.