महापालिकेच्या अग्निशमन विभागातील २९ रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी व शारीरिक तपासणी चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. उमेदवारांना महापालिकेच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल, असे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले. महापालिकेतील १२३ पदांसाठी आयबीपीएस कंपनीमार्फत प्रक्रिया राबविण्यात आली. सुरवातीला अग्निशमन विभागातील २९ जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या ५५ उमेदवारांची यादी तयार करून या उमेदवारांना शारीरिक क्षमता तपासणी चाचणीला बोलावण्यात आले होते.
मंगळवारी विभागीय क्रीडा संकुलात या उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. चाचणी परीक्षेला ४१ उमेदवारांनी हजेरी लावली. या उमेदवारांना शारीरिक क्षमता तपासणी चाचणीमध्ये मिळालेले गुण आणि ऑनलाइन लेखी परीक्षेतील गुण अशा दोन्ही परीक्षेतील गुणांची एकत्रित बेरीज करून हा निकाल जाहीर करण्यात आला.
Sr.No. |
File Name |
PDF |
1 |
Category wise application received list |
|
2 |
Jahir Pragatan For exam Dated 03-01-2024,04-01-2024,05-01-2024. |
|
3 |
Call Letter For exam Dated 03-01-2024,04-01-2024.05-01-2024. |
|
4 |
Advertisement |
|
5 |
Jahir Pragatan |
|
6 |
Result of Leading Fireman Exam |
|
7 |
Result of Fireman Exam |
|
8 |
Regarding Physical Qualification Verification Test for the posts of
Firefighters and Chief Firefighters |