नमो शेतकरी योजना दुसरा हफ्ता कधी येणार ? Namo Shetkari Yojana 2nd Installment Date

नमो शेतकरी योजना दुसरा हफ्ता कधी येणार ? Namo Shetkari Yojana 2nd Installment Date

 




मित्रांनो, राज्यशासनाकडून सुरू करण्यात आलेला नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असून याची अंदाजित तारीख जाहीर झाली आहे. Namo Shetkari Yojana 2nd Installment Date बद्दलची संपूर्ण माहिती सदर लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. शेतकऱ्यांसाठी ही माहिती खूपच महत्त्वाची असून सदरची माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
Namo Shetkari Yojana 2nd Installment Date

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळवून देण्यासाठी शासनाकडून नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली. सदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हफ्ता त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जातो. पीएम किसान योजना 2000 रु. आणि नमो शेतकरी योजना 2000 रु. याप्रमाणे शेतकऱ्यांना दरवर्षी 12000 रु. मिळत आहेत.

26 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आला होता. पहिला आता मिळाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांकडून विचारण्यात आलेला प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता कधी मिळणार ? तरी या संदर्भातील अंदाजेच माहिती कृषी विभाग व वृत्तपत्राच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता कधी येणार

नमो शेतकरी योजना 2024 चा दुसरा हप्ता अंदाजित 8 ते 10 फेब्रुवारी 2024 रोजी मिळणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आलेली आहे. 2रा हफ्ता येणार असल्याची माहिती अंदाजित देण्यात आलेली असली, तरी शासनाकडून यासंदर्भातील अधिकृत कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

शेतकऱ्यांना फक्त नमो शेतकरी योजनेचा 2000 रु. चा हफ्ता मिळणार नसून PM किसान योजनेचा 16वा हफ्ता सुद्धा मिळणार आहे. नवीन वर्षात शेतकऱ्यांना शासनाकडून गिफ्ट मिळणार असून एकाचवेळी एकंदरीत 4,000 रु. मिळणार आहेत. Namo Shetkari Yojana 2nd Installment Date बद्दलची कोणतीही माहिती किंवा अधिकृत सूचना आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही तुम्हाला त्वरित कळवू, त्यामुळे आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

नमो शेतकरी योजनेचा हप्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा