Maharashtra Police Bharti 2024: The capacity of trainees in police training
centers in the state will be increased from 8 thousand 400 to 13 thousand 400,
and the decision in this regard has been approved by the Home Department
recently about Police Bharti 2024. With this decision, the number of trainees
in 10 police training centers in the state will increase by 5,000. Know More
about Maharashtra Police Bharti 2024 at below.
सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देणेबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटकस्तरावर घेण्यास मान्यता देणेबाबत. या आशयाचा नवीन GR गृह विभागाद्वारे जाहीर केला आहे. या GR नुसार, सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. पूर्ण GR खालील लिंक वर उपलब्ध आहे.
राज्यातील सद्य:स्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्यांची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन किती पोलिस भरतीची गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे. प्रत्येक शहर- जिल्ह्याकडून वाढीव पोलिस ठाणी आणि मनुष्यबळाची मागणीचे प्रस्ताव मागवून घेतले जात आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सतेज पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचा १९७६चा आकृतीबंध नव्याने तयार केल्याचे सांगितले होते.
गृह विभागाने २३ हजार पोलिसांची भरती केली आहे, तरीदेखील पोलिस खात्याला मनुष्यबळ कमीच पडत आहे. त्यामुळे आता नवीन आकृतीबंधानुसार गृह विभागाकडून भरती होईल, असेही सूत्रांनी सांगितले.
दरवर्षी सहा हजार पदे रिक्त
राज्याच्या पोलिस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत. त्यात दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलिस सेवानिवृत्त होतात. एक हजारापर्यंत पोलिसांचे प्रमोशन होते आणि काहीजण स्वेच्छानिवृत्ती घेतात तर काहींचा अपघाती किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो. अशा कारणांमुळे दरवर्षी जवळपास सहा हजार पोलिसांची पदे रिक्त होतात अशी माहिती खास पथके व विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दोन वर्षाची मिळून अंदाजे १३ हजार पदे रिक्त असतील. नुकत्याच भरती झालेल्या नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण मार्चअखेर संपणार आहे. तत्पूर्वी, नवीन पोलिस भरतीची घोषणा होवू शकते. त्याचवेळी वयोमर्यादेच्या उंबरठ्यावरील तरूण- तरूणींना भरतीत संधी मिळू शकते, असेही सांगितले जात आहे.
नवीन पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव मागविले
जिल्ह्यातील ग्रामीण किंवा शहरी भागाचा वाढलेला विस्तार, लोकसंख्येतील वाढ, गुन्हेगारीचे प्रमाण या प्रमुख बाबींचा विचार करून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्त) वाढीव पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव गृह विभागाकडून मागविले जात आहेत. त्यानुसार संबंधित जिल्ह्यांची गरज पाहून नवीन आकृतीबंधानुसार मनुष्यबळ व पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली जाणार आहे.
प्रत्येक शहर, जिल्ह्याकडून वाढीव पोलिस ठाणी आणि मनुष्यबळाच्या मागणीचे प्रस्ताव मागवून घेतले जात आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सतेज पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचा १९७६ चा आकृतीबंध नव्याने तयार केल्याचे सांगितले होते. राज्याच्या पोलिस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत. त्यात दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलिस सेवानिवृत्त होतात. एक हजारांपर्यंत पोलिसांचा पदोन्नती होते आणि काही जण स्वेच्छानिवृत्ती घेतात, तर काहींचा अपघाती किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो. अशा कारणांमुळे दरवर्षी जवळपास सहा हजार पोलिसांची पदे रिक्त होतात, अशी माहिती खास पथके व विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आली.