नुकसानभरपाई आली या ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ पहा यादी

नुकसानभरपाई आली या ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ पहा यादी

 





शेतकऱ्यांना 36 हजारापर्यंत नुकसानभरपाई मिळणार पहा सविस्तर माहिती

मागील वर्षी म्हणजेच २०२३ या वर्षातील ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणत गारपीट झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते.

त्यामुईल राज्यात अवकाळी पाऊस व गारपीटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे.

जिरायतीसाठी हेक्टरी 13600 रुपये बागायतीसाठी हेक्टर 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी तब्बल 36 हजार रुपये मदत करण्याचे निर्देश महसूल व वन विभागाच्या वन विभागाने परिपत्रकाद्वारे जारी केले आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये २०२३ या वर्षामध्ये राज्य सरकारने घेतला होता.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषाबाहेर जाणून हि मदत देण्यात येणार आहे. या निर्णयाचे अंमलबजावणी न केल्याने शेतकऱ्यांनी सरकार विरोधात रोष व्यक्त केला होता. राज्याच्या अनेक भागामध्ये शेतकरी बांधव रस्त्यावर देखील उतरले होते.

राज्य सरकारने तातडीने याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

अशी मिळेल मदत

एचडी आर एफच्या निकषानुसार यापूर्वी शेतकरी बांधवाना 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रमाण 3 एकरच्या मर्यादेत वाढवण्यात आले.

राज्यात त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारने देखील याच निर्णयाच्या धर्तीवर जिरायती शेतीसाठी 8 हजार पाचशे रुपये ऐवजी 13500 रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी 17 हजार रुपयांऐवजी 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 22 हजार 500 रूपयांऐवजी आता 36 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे आता ज्या ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे अवकाळी पाउस व गारपीट यामुळे नुकसान झाले होते त्यांना आता लवकरच हि मदत मिळणार असल्याने त्यांच्यासाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे.
अतिवृष्टी असेल किंवा पूर असेल किंवा चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले तर पुढील हंगामामध्ये उपयोगी पडेल असे शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यात येते.

अमरावती व औरंगाबाद म्हणजेच संभाजी नगर यांच्याकडून जून ते जुलै 2023 या महिन्यात अतिवृष्टी व पुर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या व शेतजमीच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला होता. शेती पिकांच्या वर्षात जमिनीच्या नुकसानीसाठी एकूण 1071 कोटी 77 लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

या संदर्भातील जी आर शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता हा निधी किती आणि कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे तर ती यादी अशी आहे.

11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हि नुकसानभरपाई मिळणार असून ती यादी अशी आहे.

अमरावती.

अकोला.

यवतमाळ.

बुलढाणा.

वाशीम.

जालना.

परभणी.

हिंगोली.

नांदेड.

बीड.

लातूर.

तुम्ही देखील वरील जिल्ह्यातील असाल आणि तर लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये अनुदानाचा निधी जमा होणार आहे.