औरंगाबाद येथील
मुंबई खंडपीठाच्या माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया 484 शिपाई पदांसाठीची भरती रद्द करण्यात आली आहे. ज्या
उमेदवारांनी या CBOI भरती 2024 साठी अर्ज केला होता त्यांचे अर्ज शुल्क
बँकेद्वारे परत केले जाईल.
Central
Bank of India Recruitment 2024 : Central Bank of India Recruitment for 484 peon posts
has been canceled,\ due the order Passed By Hon’ble Court Of Bombay Bench at
Auranagabad. Those candidates who had applied for this CBOI Bharti 2024
their application fees will be refunded by the bank.
सेंट्रल बँकेमधील देशभरातील ४८४ सफाई कर्मचाऱ्यांची होऊ घातलेली अ. भा. स्तरावरील भरती प्रक्रिया औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी शुक्रवारी रद्द केली. केवळ हंगामी (टेम्पररी / कॅज्युअल) कर्मचाऱ्यांच्याच भरतीसंदर्भात ६० दिवसांत नव्याने प्रादेशिक भाषेत जाहिरात द्यावी. सेंट्रल बँकेच्या प्रत्येक शाखेत प्रादेशिक भाषेतही या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी, असे आदेशात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
■ बँकेने २० डिसेंबर २०२३ रोजी केवळ
इंग्रजीतून जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात औरंगाबाद विभागातील १३ पदांचा
समावेश आहे. भरतीसाठी ८ वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता आहे.
■ जाहिरात केवळ इंग्रजीमध्ये दिली, त्यामुळे ज्यांच्यासाठी जाहिरात दिली, त्यांनाच ती समजली नाही.
■ शिवाय उमेदवारांना इंग्रजी भाषा, जनरल अवेअरनेस, गणित
आणि सायको- मेट्रिक टेस्ट या विषयांची ७० गुणांची ऑनलाइन परीक्षा द्यावयाची होती.
यात उत्तीर्ण होणाऱ्यांना पुन्हा ३० गुणांची तोंडी परीक्षा द्यावी लागणार होती.
गोहाटी उच्च न्यायालयाने यापूर्वीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या
भरतीचा राखून ठेवलेला निकाल घोषित करण्याचा आदेश देत याचिका मंजूर करून
याचिकाकर्त्यांचे समायोजन करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाविरुद्ध बँकेने दाखल
केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली फेटाळली होती, तर काही जणांनी उशिरा याचिका दाखल केल्यामुळे मुंबई उच्च
न्यायालयाने याचिका फेटाळल्या होत्या. नागपूर खंडपीठाने २०१२ च्या करारानुसार ६
महिन्यांत केवळ हंगामी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे.