म्हाडा लॉटरी 2024 ; ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात ! पहा अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती – MHADA LOTTERY 2024

म्हाडा लॉटरी 2024 ; ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात ! पहा अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती – MHADA LOTTERY 2024





MHADA LOTTERY 2024 : 5990 घरांसाठी म्हाडा लॉटरी 2024 साठीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून,  लॉटरीसाठी आवश्यक लाभार्थीं पात्रता, वयोमर्यादा, लॉटरी शुल्क , घराचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख : 7 फेब्रुवारी 2024

• लॉटरीसाठी ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख :  म्हणजेच 25000 रुपये डिपॉझिट जमा करण्याची तारीख 8 फेब्रुवारी 2024

• जरा NEFT किंवा आरटीजीएस द्वारे पाठवणार असाल तर अंतिम तारीख : 9 फेब्रुवारी 2024

• लॉटरीसाठी जे अर्ज स्वीकृत झाले आहेत अशा प्रारूप यादीची प्रसिद्धी तारीख :  16 फेब्रुवारी 2024

• लॉटरीसाठी स्वीकृत झालेल्या अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची तारीख :  20 फेब्रुवारी 2024

• लॉटरीचा निकाल लागण्याची तारीख : 24 फेब्रुवारी 2024 सकाळी 10:00 वाजता

• लॉटरीमध्ये जे यशस्वी आणि प्रतीक्षा यादी मध्ये ज्यांची नावे आहेत त्यांची नावे महाडाच्या  संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्याची तारीख :  24 फेब्रुवारी 2024 संध्याकाळी 6 वाजता.

 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे ? (अर्जदाराचे)

• पॅन कार्ड

• ईमेल आयडी

• मोबाईल क्रमांक

• अर्जदाराचे आधार कार्ड

• उत्पन्नाचा दाखला

• बँकेचा रद्द केलेला चेक किंवा पासबुकची झेरॉक्स

• एक पासपोर्ट साईज फोटो

• डोमासाईल सर्टिफिकेट (महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षे पेक्षा जास्त वास्तव्याचा पुरावा)

 अर्ज करण्यासाठी पात्रता ?
• अर्जदार हा अठरा वर्ष पूर्ण झालेला असावा.

• अर्जदार मागील वीस वर्षांमधील पंधरा वर्षे तो महाराष्ट्र मध्ये रहिवासी असल्याचा पुरावा त्याच्याकडे असावा.

• अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून स्वतःच्या, पत्नीच्या अथवा अज्ञान मुलांच्या नावे मालकी तत्त्वावर भूखंड अथवा निवासी गाळा घेतला नसल्याबाबतचे तसेच शासकीय गृहनिर्माण संस्थेचा सभासद नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. (सदर अट ही प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य योजनेतील घरांसाठी लागू नाही.)

• राखीव प्रवर्गाच्या पात्रतेसंबंधी तपशीलवार माहिती संकेतस्थळावर जारी केलेल्या माहिती पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती व विमुक्त जातीच्या प्रवर्गातील लाभार्थीना जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र प्रत्यक्ष गाळयाचा ताबा घेण्यापुर्वी सादर करणे बंधनकारक राहील.

• सोडत प्रक्रियेमधील सर्व संपर्क ऑनलाईन अपडेट करण्यात येईल. लेखी पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. मागील जाहिरातीत पुणे सोडतीमध्ये अर्ज केलेला असल्यास तोच युजर आयडी वापरावा. अन्यथा या सोडतीसाठी नवीन युजर आयडी व पासवर्ड वापरावा. युजर आयडी व पासवर्ड लक्षात ठेवावा. अर्ज भरताना नमूद केलेल्या बँकेच्या खात्यावरच अनामत रक्कमेचा परतावा करण्या येणार असल्यामुळे बँक

• खातेक्रमांक IFSC कोड काळजीपूर्वक व अचूक नमूद करावा. नियोजित प्रकल्पातील योजनांचे चटई क्षेत्रफळ, विक्री किंमत व सदनिकांची संख्या अंदाजित असून त्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यशस्वी अर्जदार पात्र ठरल्यास अशा लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व जी.एस.टी. अदा करावा लागेल.

• म्हाडाने कोणत्याही प्रकारच्या एजंटची नेमणूक केलेली नाही तसेच संगणकीय सोडतीत कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप होऊ शकत नाही. याकरिता अर्जदारांना सुचित करण्यात येते की, अशा प्रकारच्या कोणात्याही प्रलोभनाला बळी पडू नये. * या योजने अंतर्गत आलेला कोणताही अर्ज किंवा सर्व अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचा किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचा अधिकार मुख्य अधिकारी / पुणे मंडळ यांनी राखून ठेवला आहे.

• जाहिरात व सोडतीच्या अनुषंगाने काही नवीन सूचना असल्यास http://www.mhadamaharashtra.gov.in  तसेच https://lottery.mhada.gov.in  संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील.

• जाहिरातीमध्ये अनावधानाने झालेल्या छपाईच्या चुकांचा कोणत्याही प्रकारे अर्जदारास फायदा घेता येणार नाही. सदर योजनेतील यशस्वी लाभार्थ्यांनी तेथे स्थापन होणाऱ्या गृहनिर्माण संस्थेचे सभासद होणे बंधनकारक राहील.

• अनामत रक्कम परताव्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जाणार नाही. अर्जदारास एका संकेतातील एकाच आरक्षण गटामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाहीत असे आढळल्यास असे अर्ज सोडतीपुर्वी रद्द केले जातील. विशेष सूचना – यशस्वी झालेल्या अर्जदारांनी अनामत रक्कमेचा परतावा मागितल्यास अर्जासोबत भरलेल्या रक्कमेतून 50% रक्कम कपात करण्यात येईल.

उत्पन्न मर्यादा खालील प्रमाणे राहील

 

I. अत्यल्प उत्पन्न गट (EWS) :

मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे महानगर क्षेत्र (PMRDA), नागपूर महानगर क्षेत्र (NMRDA) नागपूर सुधार प्रन्यास (NIT) प्रदेश तसेच 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र रूपये 6,00,000/- पर्यंत

उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र रूपये 4,50,000/- पर्यंत

II. अल्प उत्पन्न गट (LIG) :

मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे महानगर क्षेत्र (PMRDA), नागपूर महानगर क्षेत्र (NMRDA) नागपूर सुधार प्रन्यास (NIT) प्रदेश तसेच 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र रूपये 9,00,000/- पर्यंत

उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र रूपये 7,50,000/- पर्यंत

III. मध्यम उत्पन्न गट (MIG) :

मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे महानगर क्षेत्र (PMRDA), नागपूर महानगर क्षेत्र (NMRDA) नागपूर सुधार प्रन्यास (NIT) प्रदेश तसेच 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र रूपये 12,00,000/- पर्यंत

उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र रूपये 12,00,000/- पर्यंत

IV. उच्च उत्पन्न गट (HIG) :

मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे महानगर क्षेत्र (PMRDA), नागपूर महानगर क्षेत्र (NMRDA) नागपूर सुधार प्रन्यास (NIT) प्रदेश तसेच 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र कमाल मर्यादा नाही

उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र कमाल मर्यादा नाही

उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र रूपये 12,00,000/- पर्यंत

IV. उच्च उत्पन्न गट (HIG) :

मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे महानगर क्षेत्र (PMRDA), नागपूर महानगर क्षेत्र (NMRDA) नागपूर सुधार प्रन्यास (NIT) प्रदेश तसेच 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र कमाल मर्यादा नाहि.

मूळ जाहिरात पहा