पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती हाॅलटिकीट update PCMC ADMIT CARD UPDATE 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती हाॅलटिकीट update PCMC ADMIT CARD UPDATE 2023

 




पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी

जाहीरात क्रमांक १८४/२०२२ चे अनुषंगाने जाहीर निवेदन

Hepldesk Number & Helpdesk Email

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४ / २०२२ नुसार अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत आले होते.

ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची दिनांक २६/०५/२०२३ दिनांक २७/०५/२०२३ व दिनांक २८/०५/२०२३ रोजी तीन सत्रात ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार असून त्याबाबतची प्रवेशपत्रे (Admit Card) उमेदवारांना दिनांक १२/०५/२०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करण्याबाबत काही तांत्रीक अडचणी आल्यास उमेदवारांनी सोमवार ते शनिवार या दिवशी फक्त सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत Hepldesk Number +91 7353293111 संपर्क साधावा. या क्रमांकावर तसेच Helpdesk Email - pcmchelpdesk2022@gmail.com या ई-मेलवर

ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करुन घेणे, परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे ही संबंधित उमेदवारांची जबाबदारी आहे. संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड करणेस अडचण आली, इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.