RRB Group D Exam: आरआरबी Group D विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देणार, नोंदणीसाठी लिंक सूरू, वाचा सविस्तर

RRB Group D Exam: आरआरबी Group D विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देणार, नोंदणीसाठी लिंक सूरू, वाचा सविस्तर

 





रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या आरआरबी ग्रूप डि परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे. आरआरबीन एनटीपीसीनं विद्यार्थ्यांना बँक खात्याचा तपशील सादर करण्याची लिंक सक्रिय केली आहे.

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या आरआरबी Group D परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे. आरआरबीन Group D विद्यार्थ्यांना बँक खात्याचा तपशील सादर करण्याची लिंक सक्रिय केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आरआरबी ग्रूप डि पहिल्या 1 स्टेजमधील कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा दिली होते ते विद्यार्थी परीक्षा फी परत मिळण्यासाठी नोंदणी कर शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र मिळूनही परीक्षा दिली नाही त्यांना फीची रक्कम परत दिली जाणार नाही.(RRB Group D exam fee refund Link active to submit bank account details check here)



नोंदणी कशी करायची?

आरआरबी Group D पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सादर करावा लागेल. उमेदवारांनी बँक खात्याचा तपशिल भरताना काळजी घेण्याची गरज आहे. एकदा विद्यार्थ्यांनी बँक खात्याचा तपशील सबमिट केला की तो बदलता येत नाही. तसेच, बँक खाते वैध असेल त्या खात्यावरचं रक्कम जमा होईल, असं आरआरबीकडून सांगण्यात आलं आहे.


रक्कम मिळण्यास वेळ लागणार

आरआरबी Group D परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास काही वेळ लागेल, असं आरआरबी कडून स्पष्ट करण्यात आलंय. RRB ने म्हटले आहे की, बँक खात्याचा तपशील सादर करण्यात काही अडचण आल्यास हेल्प ऑप्शनचा वापर करुन आवश्यक ती मदत मिळवू शकता. आरआरबी  कडून परीक्षा शुल्क परत देण्यात येणार आहेत.


14 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान बँक खाते लिंक फॉर्म भरता येतील. 



बँक खाते लिंक फाॅर्म