नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता शेतकऱ्यांना मिळणार 12,000/-वार्षिक

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता शेतकऱ्यांना मिळणार 12,000/-वार्षिक

 




नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेत आता 6 हजार रुपये नाही तर 12 हजार रुपये मिळणार आहे. महाराष्ट्र सरकार माध्यमातून नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र सरकारकडून  बजेट अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे. या अर्थसंकल्प मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी जी माहिती देण्यात आलेली आहे ही माहिती सविस्तरपणे आपण आज जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो महाबजेट 2023 चा अर्थसंकल्प सरकारकडून सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वार्षिक 6 हजार रुपये नाही तर वार्षिक 12 हजार रुपये दिले जाणार आहेत. 6 हजार रुपये केंद्र सरकारकडून आणि 6 हजार रुपये राज्य सरकारकडून असे मिळून 12 हजार रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. ज्या पद्धतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चे पैसे शेतकऱ्याला दिले जात होते अगदी त्याच पद्धतीने महा सन्मान निधी योजनेचे पैसे सुद्धा शेतकऱ्याला दिले जाणार आहेत.

• प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर.

• नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना.

• प्रति शेतकरी प्रति वर्ष 6 हजार रुपये राज्य सरकारकडून मिळणार.

• केंद्र सरकारचे 6 हजार रुपये आणि राज्य सरकारचे 6 हजार रुपये असे मिळून 12 हजार रुपये प्रति वर्ष मिळणार.

• राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार.

• सहा हजार नऊशे कोटी रुपयांचा राज्य सरकार उचलणार.