मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना | आता प्रत्येक शेतकऱ्यांना भेटणार शेतीसाठी रस्ता

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना | आता प्रत्येक शेतकऱ्यांना भेटणार शेतीसाठी रस्ता

 



मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना | आता प्रत्येक शेतकऱ्यांना भेटणार शेतीसाठी रस्ता.

नमस्कार, शेतकरी बांधवानो आपल्या सर्वांना तर माहीतच आहे, शेतरस्ता म्हणजे शेतकऱ्यांचा एक मुख्य आणि अविभाज्य घटक आहे कारण पूर्वी शेती कसणारे खूप शेतकरी नसायचे त्याकारणाने खूप अशी जमीन पडीक असल्याकारणाने वहिवाट,पाऊलवाट आणि तसेच गाडीवाटने जाणे-येणे तितके अवघड नव्हते. पण आता शेती कमी आणि कसणारे खूप झाल्याकारणाने वाटेच्या समस्या उदभवत आहेत. अश्या अडचणी लक्ष्यात घेता शासनामार्फत सतत नवं-नवीन उपक्रम आणि योजना राबविल्या जातात.

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावात शेतरस्ते, पाणंद रस्ते तयार करण्याच्या दृष्टिकोनातून मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना राबविण्याचा निर्णय आज २७ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

देशातील किंवा राज्यातील शेतकरी आणि नागरिक हा शासनासाठी प्रथम दुआ असतो. म्हणूनच गांधीजींनी रोजगार हमी योजनेअंतर्गत एक संकल्पना मांडली होती, ‘ मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा देश आणि राज्य समृद्ध त्याच संकल्पनेचा आढावा घेऊन राज्यात शेतरस्ते, पाणंद रस्ते योजना राबविताना येणाऱ्या अडचणी लक्ष्यात घेऊन आणि त्या अडचणीसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून मनरेगा आणि रोजगार हमी योजनेचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. याच एकत्रीकरणाला मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना (matoshri gram samrudhi shet panand raste yojana)


मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेमुळे आता शेतकऱ्यांना बारमाही पीक घेता येणार आणि मालसुद्धा मार्केटमध्ये विक्रीसाठी लवकर पोहचता करता येणार !

महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना शेतरस्ते ( shet raste ) आणि पाणंद ( Panand ) रस्ते चांगल्या प्रतीचे नसल्याकारणाने बारमाही म्हणजे सर्व ऋतूमध्ये पिकाची लागवड करता येत नाही, पावसाळ्यातील पिके आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असले तरी व्यवस्थित शेतरस्ते नसल्यमुळे शेतकरी अशी पिके पिकविण्याचा विचार करत नाही, परिणामी जर शेतरस्ते आणि पाणंद रस्ते मजबूत आणि व्यवस्थित करण्यात आली तर शेतकऱ्यांना शेतमाल पिकविण्यात काही अडचण येणार नाही तसेच योग्य रस्त्यामुळे मालसुद्धा मार्केटमध्ये विक्रीसाठी वेळेवर पोहचेल आणि परिणामी मालाला योग्य भाव येईल.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा उद्देश :-

Ø  मनरेगा आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध होईल.

Ø  ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतरस्ते आणि पाणंद रस्ते बारमाही वापरता येतील अश्या योग्य तयार करून देणे.

Ø  ग्रामीण भागात कमीत कमी ५ किलोमीटरपर्यंतचे शेत पाणंद रस्ते निर्माण करणे.

Ø  आधुनिक यंत्राचा वापर करून शेतकरी कोणत्यापण ऋतूमध्ये पीक घेऊ शकेल अश्या मजबूत शेतरस्ते, पाणंद रस्ते उभारणीला प्राधान्य देणे.

Ø  पर्यायी शेतरस्ते चांगले झाल्यास योग्य ते पीक घेऊन शेतकऱयांना आर्थिकदृष्ट्या बळकट बनविणे.

शेतकऱ्यांना शेत रस्ता 100% अनुदान 

शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रांमार्फत करण्यात येत असल्यामुळे व शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता व यंत्रसामुग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असल्यामुळे तसेच शेतरस्ते हे रस्ते योजनेमध्ये येत नसल्याने वाचा येथील क्रमांक १ येथील दिनांक २७.२.२०१८ च्या शासन निर्णयान्वये विविध योजनांच्या अभिसरणामधून पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजनाराज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच वाचा येथील क्रमांक (२) ते (५) येथील शासन शुध्दीपत्रकान्वये योजनेत वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. सदर योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन तसेच सदर योजनेत तयार होणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता परिभाषित केलेली नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेत रस्त्यांची कामे होवूनही रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटत नाही. रस्त्याची गुणवत्ता परिभाषित नसल्यामुळे काही ठिकाणी अतिक्रमण काढून रस्त्यावर फक्त माती टाकली जाते. याने रस्ता रुंद झालेला दिसून येतो मात्र पाऊस पडल्यावर तेथे चिखल होऊन रस्ता वापरणे दुसह्य होते. तसेच अधिक पाऊस झाल्यास असे मातीचे रस्ते वाहून जातात व केलेल्या कामाचा परिणाम शून्यावर येतो. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी आणि गावकरी समृद्ध होतील हे स्वप्न पाहणे आवश्यक
आहे. राज्यात मी समृद्ध तर गाव समृद्धआणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना आहे.

 

मातोश्री ग्राम समृद्धी योजना GR 

१.       विविध योजनांच्या अभिसरणामधून पालकमंत्री शेत/ पाणंद रस्ते योजनाराबविण्यासाठी निर्गमित केलेला वाचा क्र.१ येथील दि. २७/१२/२०१८ चा शासन निर्णय व वाचा क्र. (२) ते (५) येथील शासन शुध्दीपत्रक याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत. २. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी आणि सर्व गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून मी समृध्द तर गाव समृध्दआणि गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्दही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शेत/पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता आवश्यक असणाऱ्या साधनांची ने-आण करण्याकरीता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणीआंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. या यंत्रसामुग्रीची वाहतुक करण्याकरीता, बारमाही वापराकरीता शेत/ पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेत/पाणंद रस्ते तयार करण्याकरिता मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनाराबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना” कार्यक्षमतेने राबविण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

शेत रस्ता अनुदान योजना 

शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. भूमापन १०८०/६८/४९६६/ल-१, दिनांक ४ नोव्हेंबर१९८७ अन्वये ग्रामीण भागातील रस्त्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करण्यात आलेली आहे.

i) एका गावावरुन दुसऱ्या गावास जाणारे रस्ते ग्रामीण रस्ते व हद्दीचे ग्रामीण रस्ते (गाव नकाशामध्ये दोन भरीव रेषाने दाखविले असून या रस्त्याची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट केलेली नाही.) ग्रामीण गाडीमार्ग (गाव नकाशामध्ये तुटक दुबार रेषाने दाखविले असून ज्या भूमापन क्षेत्रामधून जाते त्यामध्ये पोट खराब म्हणून दर्शविलेले आहे, अशा रस्त्यांची नोंदणी साडेसोळा ते एकवीस फूट आहे.) पाय मार्ग (गाव नकाशामध्ये तुटक रेषेने दर्शविले असून ज्या भूमापन क्षेत्रामधून जातो त्यामध्ये पोट खराब म्हणून दर्शविलेले आहे अशा रस्त्यांची रुंदी सव्वा आठ फूट आहे.)
ii) शेतावर जाण्याचे पाय मार्ग व गाडी मार्ग
हे रस्ते नकाशावर दर्शविलेले नाहीत. परंतु, वाद निर्माण झाल्यास अशा रस्त्यांबाबत निर्णय देण्याचे अधिकार कलम १४३ नुसार तहसिलदारांना दिलेले आहेत. त्यानुसार वहिवाटीचे विहित असलेले रस्ते.
iii)इतर ग्रामीण रस्ते
या योजने अंतर्गत पुढीलप्रमाणे शेत/पाणंद रस्त्यांची कामे घेता येतील.
i) अस्तित्वातील शेत/पाणंद कच्च्या रस्त्यांचे मजबुतीकरण करणे.
ii) शेत/पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करुन कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे करणे.

शेत/पाणंद रस्ते योजना 

राज्यातील सर्व शेत/पाणंद रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे (जिल्हा परिषद आणि शासन) मापदंडाप्रमाणे बांधण्यात यावेत. यात फक्त जागेच्या उपलब्धतेप्रमाणे रुंदीमध्ये फरक पडेल. मात्र रस्त्यांची उंची, खडीचे आकार, खडीच्या परताची जाडी, रस्त्याच्या दोन्ही बाजूचे निचऱ्यासाठीचे नालेरस्त्यांच्या बाजूला वृक्ष लागवड, गुणवत्तेची चाचणी इत्यादी सर्व बाबी मानक मापदंडाचे असावे.

मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना

मनरेगा व राज्य रोहयो या दोन्ही योजनांचा मुख्य उद्देश मागेल त्याला अकुशल रोजगार उपलब्ध करुन देणे असा असून त्यासोबतच ग्रामीण भागात सामूहिक उत्पादक मत्ता व मुलभूत सुविधा निर्माण करणे हे ही तेवढेच महत्वाचे उद्दीष्ट आहे. मनरेगा अंतर्गत केंद्र शासना मार्फत निधी उपलब्ध करुन दिला जातो. मात्र विविध कामे करताना अकुशल : कुशल खर्चाचे प्रमाण ६०:४० या प्रमाणात राखणे आवश्यक असल्यामुळे ज्या कामावर हे प्रमाण राखले जाऊ शकत नाही अशी कामे विशेषत: रस्त्याची कामे हाती घेण्यास अडचणी येतात आणि शेत/पाणंद रस्त्यांची तर प्रचंड मागणी आहे आणि गरजही आहे ही बाब विचारात घेवून प्रत्येक रस्त्याच्या कामावर अकुशल : कुशल खर्चाचे प्रमाण ६०:४० राखण्यासाठी राज्य रोहयोतून पूरक कुशल निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकाप्रमाणे प्रस्तावित दर्जाचे रस्ते खालील नमुना अंदाजपत्रकाप्रमाणे तयार करण्यात यावेत. तथापि ज्या ज्या वेळी DSR बदलेल त्याप्रमाणे अंदाजपत्रक बदलेल. शेत /पाणंद रस्ते हे सुध्दा अन्य महामार्ग/रस्ते एवढेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शेत/पाणंद रस्ते तयार करणे आवश्यक ठरते. यास्तव उच्च गुणवत्तेसह रस्त्यांचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद/शासन आणि वन जमीन असल्यास वन विभागाद्वारे तयार करण्यात येऊन त्यास तांत्रिक मान्यता देण्यात यावी. शेत/पाणंद रस्ता तयार करण्यासाठीचे मापदंड निश्चित
करण्याची कार्यवाही सुरु आहे.

 

कशी असेल शेत रस्ता योजना 

दरम्यानच्या कालावधीत ग्राम विकास विभागाने ग्रामीण रस्ते तयार करण्यासाठी विहित केलेले मापदंड लागू राहतील. शेत/पाणंद कच्चा रस्ता मजबुतीकरण करताना दोन्ही बाजूने चर खोदून त्यामधून निघणारी माती/मुरुम ही शेत/पाणंद रस्त्यामधील भागात टाकण्यात येऊन त्यावर व्यवस्थित रोलरने दबाई करावी. रस्त्याचा भाग हा काळया मातीतून जात असल्यास भरावावर किमान ३०० मि.मी. जाडीचा कठीण मुरुम टाकण्यात यावा व त्यावर रोलरने व्यवस्थितरित्या पाणी शिंपडून दबाई करावी. स्थानिक भौगोलिक स्थितीचा विचार करता जर मुरूमीकरण करून पक्का रस्ता बारमाही वापराकरिता तयार होणार असेल तर तसा पक्का रस्ता तयार करण्यात यावा अन्यथा मुरुमावर खडीकरण करणे आवश्यक आहे.

 

कसा बनवणार शेत रस्ता 

त्यासाठी
वापरण्यात येणाऱ्या खडीची एकूण जाडी २२५ मि.मी. असावी. त्यातील खालच्या थराच्या १५० मि.मी. असावी व त्या खडीचा आकार ग्रामीण रस्ते संहिता (Rural Road Manual) नु 5/ 16 (७५mm to ४.७५mm) असावी व वरील थराच्या खडीची जाडी ७५ मि.मी. असून त्या खडाचा आकार Grading || (५३mm to ४.७५mm) असावी. सदर खडी ही जवळपासच्या खदानीतून उपलब्ध होणारी असावी. खडी ही योग्य आकारमानाची फोडून घ्यावी व त्यानंतरच वापरावी. (Matoshri Gram Samridhi Yojana)  प्रत्येक Layer मधील खडी पसरविल्यानंतर योग्य प्रकारे कोरडी व त्यानंतर पाणी मारुन रोलरने दबाई करावी. वेगवेगळ्या कामातून उपलब्ध होणाऱ्या दगड/माती/मुरुम यांचा कल्पकतेने वापर करताना दगड हा काळा व वजनदार असावा तो दगड योग्य आकारमानाचा फोडून घ्यावा. शक्यतो दगड फोडल्यानंतर १०० टक्के वापर होईल हे बघावे.

 

रस्त्यासाठी कोणते मटेरियल वापरणार 

शक्यतो काळया मातीचा भराव करणे टाळावे. भरावात वापरण्यात येत असलेला मुरुम कठीण असावा व खडीकरणासाठी ३०% पर्यंत पकडीसाठी वापरण्यात येणारा मुरुम हलका असावा. CD Work- नळकांडी पुल बांधताना शक्यतो सिमेंट पाईपचा वापर करावा तथापि सिमेंट पाईप टाकल्यानंतर दोन्ही बाजूने किमान M-१० काँक्रिटच्या भिंती (Head Wall) असाव्यात त्यामुळे रस्त्याचा भराव खचणार नाही व CD Work चे आयुष्य वाढेल. (Matoshri Gram Samridhi Yojana) शक्यतो पाणंद रस्त्यासाठी मुरुमी रस्तेच पुरेसे खडीचे रस्ते बांधकाम केल्यास पुढील २-३ वर्षात त्यावर डांबरीकरण करणे आवश्यक आहे. अन्यथा वाहतुकीमुळे खडी रस्त्यावर पसरुन रस्ता वाहतुकीस योग्य राहणार नाही. माती मुरुमाचा भराव करताना रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूने उतार (Camber) देणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्त्यावर
पावसाचे पाणी साचणार नाही.

 

शेत रस्ता अनुदान योजना 2021

शेत/पाणंद रस्ते तयार करण्यासाठी शासन निर्णयात नमूद केलेल्या आवश्यक बाबी विचारात
घेतल्यास i) एक किमी खडीकरणासह पक्कया रस्त्याचे अंदाजपत्रक आज रोजी अंदाजे
रु.२३,८४,८५६ रकमेचे होते. मनरेगा – [- अकुशल -रु.९,०२,८७९ -रु.६,०१,९१९ राज्य रोहयो कुशल रु.८.८०.०५८ एकुण
रु.२३,८४,८५६ स्थानिक भौगोलिक परिस्थिती, मुरुम व खडी वाहतुकीचे अंतर इत्यादी बाबी मुळे अंदाजपत्रकाची रक्कम कमी-जास्त होऊ शकेल. तसेच, DSR बदलल्याने सुध्दा हे बदलेल. सदर अंदाजपत्रकात पुढील रकमांचाही समावेश आहे. रॉयल्टी -रु.२,०४,३४७ जी.एस.टी -रु.१.५१.६२७ एकूण -रु.३,५५,९७४ म्हणजेच अकुशल कामासाठी रु.९,०२,८७९ व त्या प्रमाणात कुश रु.६,०१,९१९ हे मनरेगातून अनुज्ञेय होतील आणि पूरक कुशल खर्चासाठी रु.८,८५ 6 / 16 रोहयोतून उपलब्ध करुन दिले जातील. पूरक कुशल निधीची तरतुद शेत/पाणंद रस्ते योजना” या लेखाशिर्षात करण्यात येईल व मागणी प्रमाणे निधी वितरित करण्यासाठी ऑनलाईन (ONLINE) प्रणाली विकसित करण्यात येईल. अथवा सध्याच्या नरेगा पोर्टलवर वेगळी (Matoshri Gram Samridhi Yojana) लिंक(LINK) उपलब्ध करुन देण्यात येईल.

i) एक किलोमीटर मुरुमाच्या पक्क्या रस्त्याचे अंदाजपत्रक आज रोजी अंदाजे रू.९,७६,४२०/- इतक्या रकमेचे होते. मनरेगा अकुशल- रु.७,५८,६८३/- रु.२.१७.७३७/-  एकुण रु.९,७६,४२०/- असे एकूण अनुदान ९ लाख ७६ हजार ४२० रु. एवढे अनुदान देय राहील.

 

शेत रस्ता आराखडा मंजूरी 

i.ग्राम पंचायत अंतर्गत सर्व गावांमध्ये आवश्यक असलेल्या शेत/पाणंद रस्त्यांचा आराखडा (यादी) ग्राम सभेच्या मंजुरीने ग्राम पंचायत तयार करेल. (दिनांक ३१ मे पर्यंत) वरील प्रमाणे तयार करण्यात आलेली प्रत्येक ग्रामपंचायतीची शेत / पाणंद रस्त्यांची यादी गट विकास अधिकारी एकत्रित करतील व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर करतील. (१५जून पर्यंत)
मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची यादी एकत्रित करुन आराखडा सचिव (रोहयो) यांच्याकडे सादर करतील. (३० जून पर्यंत) सचिव (रोहयो) हे सर्व जिल्हयांच्या प्राप्त आराखडयानुसार उपलब्ध निधीच्या मर्यादेत पुरक निधी मंजुरीचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी मा.मंत्री रोहयो यांच्याकडे सादर करतील. (३१ जुलै
पर्यंत) मा.मंत्री रोहयो हे जिल्हानिहाय, ग्रामपंचायत निहाय, शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना पूरक निधी मंजुर करावयाच्या यादीस मान्यता देतील. (१५ ऑगस्ट पर्यंत)

 

ग्राम पंचायतीची जबाबदारी:-

i)                 मातोश्री ग्राम समृध्दी शेत / पाणंद रस्ते योजनाकार्यक्रमांतर्गत शेतक-यांच्या मागणी नुसार शेत / पाणंद रस्त्यांचा आराखडा तयार करणे.
ii) ज्या ठिकाणी शेतक-यांनी रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे अशा ठिकाणी शेतक-यांची बैठक घेवून शेतक-यांना समजावून सांगणे व अतिक्रमण दूर करणे.
ii) ग्राम पंचायत स्तरावर प्रकरण निकाली लागत नसल्यास अशी प्रकरणे तालुका स्तरीय समितीकडे सादर करून तालुकास्तरीय समितीच्या निर्देशानुसार नियमानुसार पोलीस यंत्रणेची मदत घेणे.

महसूल यंत्रणेची जबाबदारी 

ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे, असा रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तहसिलदार यांनी ज्या शेतक-याने रस्ता अतिक्रमण केला आहे. त्या शेतक-यांची बैठक घेवून अतिक्रमण दूर करण्याबाबत सुचित करण्यात यावे. अतिक्रमण धारक शेतकरी अतिक्रमण काढण्यास तयार नसल्यास, महसूल नियमावलीचा अवलंब करून अतिक्रमण मुक्त करण्याची कार्यवाही करण्यात यावी. या साठी अतिक्रमण निश्चीत करण्याकरीता मोजणी आवश्यक असल्यास शासकिय खर्चाने मोजणी करावी. त्याकरीता कोणतेकी शुल्क आकारण्यात येवू नये. (Matoshri Gram Samridhi Yojana) ही मोजणी करताना तातडीची मोजणी म्हणून करण्यात यावी. मोजणी झाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ खुणा निश्चित करण्यात याव्यात. निश्चित केलेल्या खुणांनुसार जेसीबी, पोकलेन इत्यादी यंत्रांव्दारे चर खोदण्याचे किंवा भरावाचे काम सुरु असताना महसुल यंत्रणांचे तलाठी किंवा महसूल यंत्रणेचे तत्सम दर्जाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे जेणे करून अतिक्रमण काढणे सुलभ होईल.

संयोजनातून शेत/पाणंद रस्ते तयार करणे:

रस्त्यांचे १००% काम मग्रारोहयोतून करणे शक्य आहे. मात्र त्याकरीता शेत/पांणद रस्त्याच्या कामासोबतच अधिक अकुशलचे प्रमाण देऊ शकणारी कामेसुध्दा करावी लागतात. त्यानुसार वाचा क्रमांक ६ येथील दिनांक ३० मार्च, २०२१ च्या शासन निर्णयामधील तरतुदींनुसार कार्यवाही करावी. अशी कार्यवाही केल्याने मग्रारोहयोतील अकुशल कामाचे प्रमाण वाढेल व रस्त्याच्या कुशल कामासाठी राज्य रोहयोमार्फत लागणारा पुरक निधी कमीत कमी लागेल. २१. अभिसरणातून शेत/पाणंद रस्ते तयार करणे: मग्रारोहयोसह राज्याचे इतर सर्व योजनांच्या निधींच्या वापरातून रस्त्यांची कामे करणे. 

शेत/पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करुन कच्चा रस्ता तयार करणे.

ज्या ठिकाणी शेतकऱ्याची सहमती आहे, अशा ठिकाणी अर्थमुव्हर उत्खनन यंत्राच्या सहाय्याने योग्य आखणी करुन दोन्ही बाजूने चर खोदून त्यामधून निघणारी माती/मुरुम शेत/पाणंद रस्त्यामधील भागात टाकण्यात यावी. तसेच चरात खोदून निघालेली माती/मुरुम योग्य प्रमाणात पसरवून रस्त्यांचा कच्चा भराव तयार करण्यात यावा. असा कच्चा रस्ता तयार करण्याकरीता टायर असलेले बॅकहो लोडर व एक्सकॅव्हेटर (७० HP पेक्षा अधिक क्षमता असलेले जेसीबी इत्यादी अर्थमुव्हर) याकरीता १०० तास प्रति किलोमीटर व चेन असलेले एक्सकॅव्हेटर (२०० HP पेक्षा अधिक क्षमता असलेले पोकलेन इत्यादी अर्थमुव्हर) करीता ४० तास प्रति किलोमीटर अनुज्ञेय राहील.

मातोश्री ग्राम समृद्धी योजना 

यापेक्षा प्रति किलोमीटर अधिक तास लागत असल्यास तालुकास्तरीय समितीची मान्यता आवश्यक राहील. शेत/पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करुन कच्चा रस्ता तयार करताना शेत/पाणंद रस्त्याची भरावाची रुंदी पुरेशी असावी. त्यातून किमान दोन ट्रॅक्टरची वाहतूक होईल अशाप्रकारे असावी. खडीकरणाची रुंदी किमान ३.०० मी. असावी. दोन्ही बाजूने चर खोदल्यामुळे भरावाची रुंदी पुरेशी असावी. तसेच खोदकाम झालेल्या चरातून पावसाचे पाणी व्यवस्थित वाहून निघेल अशाप्रकारची चराची रुंदी असावी.