आधार सेंटर अर्ज सुरु,पहा अर्ज कसा व कोठे करायचा आहे.

आधार सेंटर अर्ज सुरु,पहा अर्ज कसा व कोठे करायचा आहे.

 



आधार सेंटर अर्ज सुरु,पहा अर्ज कसा व कोठे करायचा आहे.


महाराष्ट्र शासन माहिती व तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग यांच्याकडील पत्र व मा. जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांच्या सुचने अन्वये कोल्हापूर जिल्ह्यातील निश्चित केलेल्या ठिकाणामधील शासकीय कार्यालयीन जागेत तात्पुरत्या स्वरुपात खाजगी आधार संच सुरु करणेची कार्यवाही सुरु करण्यात येत असून

दि. 01 नोव्हेंबर 2021 ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत स्वतःचे खाजगी आधार संच असणाऱ्या इच्छूक ग्रामपंचायत अथवा आपले सरकार सेवा केंद्र चालक (VLE) यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर (टपाल शाखा)येथे समक्ष कागदपत्रासह अर्ज जमा करणे बंधनकारक आहे. (Aadhar Center Process)

10 डिसेंबर 2021 या अंतिम दिनांकानंतर आलेले कोणतेही अर्ज किंवा कागदपत्रे स्विकारले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना, अटी व शर्ती व इतर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यापूर्वी ज्या अर्जदारांनी खाजगी आधार संच सुरु करणेकरीता इकडे मागणी अर्ज केलेले आहेत अशा अर्जदार यांनी या प्रेस नोट अन्वये नव्याने अर्ज करणेचे आहेत.

सेंटर उभारणीसाठी आवश्यक सुचना व अर्जासोबत जोडणेची कागदपत्रे

1.  स्वत:चा आधार संच असलेबाबतचे व ते विवरण पत्रातील शासकीय जागेत सुरु करणेस मान्य असलेले | प्रतिज्ञापत्र (परिशिष्ठ अ).

2.  शासकीय अधिकारी यांचे VLE च्या नावे परवानगी पत्र अथवा ना हरकत दाखला अथवा शासकीय जागेचे VLE च्या नावाचे करारपत्र

3.  आधार कार्डची प्रत व रहिवासी पुरावा

4.  आधार सुपर वायझर प्रमाणपत्र

5.  १ जानेवारी २०२० ते 30 सप्टेंबर २०२१ अखेर आपले सरकार सेवा केंद्राची व्यवहारांची संख्या (Transaction Entry) पुरावा वयाचा दाखला

6.  जाहिरात प्रसिध्द झालेल्या दिनांकानंतरचे पोलिस अधिक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र

7.  परिशिष्ठ अ व परिशिष्ठ ब .

 

आधार सेंटर अटी व शर्ती

1.  माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील क्र.मातंसं-1717/सीआर/83/39 दिनांक 16/09/2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार आधार केंद्र चालक हा स्वत: आपले सरकार सेवा केंद्राचा vle असावा. त्या संदर्भातील KIOSK ID अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.

2.  एका vle / ग्रामपंचायतीच्या नांवे एका पेक्षा अधिक KIOSK ID असल्यास अशा vle / ग्रामपंचायतीस एकच आधार केंद्र सुरु करण्याची परवानगी देण्यात येईल.

3.  आधार सेंटर व परवानगी देताना खालीलप्रमाणे पसंतीक्रम देण्यात येईल.

Ø ग्रामपंचायत स्वत: चालविणेस तयार असेल.

Ø ग्रामपंचायत मालकीचे गाळे असल्यास भाडेतत्वावर घेणार असेल.

Ø शासकीय कार्यालय – BSNL, MSEB व इतर शासकीय कार्यालय ग्रामपंचायत स्वत: वगळून एकाच ठिकाणासाठी एका पेक्षा जास्त VLE नी अर्ज केल्यास त्यांच्या आधार केंद्र चालवण्याच्या अनुभवाच्या आधारे आणि आपले सरकार केंद्राच्या व्यवहारांच्या संख्येच्या आधारे पसंती क्रम देण्यात येईल

1.  विवरण पत्रातील शासकीय जागेत सुरु करणे संबंधी vle च्या नांवे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची मान्यता आणि जागा उपलब्ध असल्या संबंधी पत्र व कागदपत्र असणे आवश्यक राहील vle अथवा ग्रामपंचायत यांचे स्वत:चे आधार संच असणे बंधनकारक आहे.

2.  आधार केंद्रचालक यांचे चारित्रय पडताळणी प्रमाणपत्र मा.जिल्हा पोलिस अधिक्षक, कोल्हापूर यांचे देणे बंधनकारक राहील

3.  आधारचे कामकाज हे सकाळी 10 ते सांयकाळी 6 या कालावधीतच शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी करणे बंधनकारक राहील

4.  आधार कॅम्प किंवा होम एनरॉलमेंटचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून आपणास प्राप्त झाल्यास कोणतेही जादा आकारणी न करता आदेशाचे पालन करुन कामकाज करणे व संबंधित अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील

5.  UIDAI यांनी नेमून दिलेल्या आकारणीपेक्षा जास्त रक्कमेची आकारणी केल्यास किंवा इतर कोणतीही तक्रार आल्यास थेट UIDAI मार्फत अथवा नियंत्रण अधिकारी द्वारे कारवाई करण्यात येईल

6.  खाजगी आधार संच हे शासकीय जागेमध्ये सुरु करण्यासाठी मान्यता मिळालेनंतर संबंधित Enrollment Agency यांना आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता (बॅक गॅरंटी इ.) लवकरात लवकर पूर्ण करणे बंधनकारक राहील.


आधार संबंधित महत्वाचे

अधिकृत वेबसाईड

येथे पहा

आधार डाउनलोड करण्याची लिंक

येथे पहा

आधार स्टेटस चेक करा

येथे 

आधार अपडेट करण्यासाठी अर्ज

येथे पहा

आधार सेंटर मिळवण्याचा फॉर्म

येथे पहा

 आधार सेंटर मिळवण्याचा जिल्हा        

 येथे पहा