मुलाखतीसह पदभरतीसाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत
१. मा उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर येथील याचिका क्र ४०७९/२०१९ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत त्यांना MEPS नियमानुसार खाजगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम द्यावयाचे आहेत.
२. ज्या उमेदवारांना यापूर्वी इ ११वी ते इ १२ वी या गटातील उच्च माध्यमिक पदासाठी ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत परंतु असे उमेदवार पदव्युतर पदवी किमान व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असतील व पदव्युतर पदवी किमान व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्याची नोंद पवित्र पोर्टल वर YES म्हणून केले आहे त्यांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देण्यात येत आहेत.
३. तसेच इ ९ वी ते इ १० वी या गटातील माध्यमिक पदासाठी पदवीस्तरावर उत्तीर्ण परंतु ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत अशा उमेदवाराकडून मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देण्यात येत आहेत.
४. खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आलेले होती त्यामुळे कमाल वय वयाधिक (Overage ) याकारणास्तव ज्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम वर नमूद उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंद केल्यानंतर देण्यात येतील. प्राधान्यक्रम देण्याबाबत पोर्टलवर स्वतंत्र पणे सूचना देण्यात येतील.
५. वरील क्र २ ते ३ मधील उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावयाचे आहेत.
६. वरील क्र २ ते ३ मधील ज्या उमेदवारांनी यापूर्वी मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीत व आता नव्याने प्राधान्यक्रम देणार आहेत, त्यांना त्यांच्या समांतर आरक्षणाची (उदा. महिला, माजी सैनिक, अंशकालीन ,प्रकल्पग्रस्त,भूकंपग्रस्त,खेळाडू,अनाथ इ ) नोंद एकदाच करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकदा माहिती save केल्यानंतर पुन्हा समांतर आरक्षण दुरुस्त करता येणार नसल्याने अशा उमेदवारांनी समांतर आरक्षण विषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करावी. एकदा माहिती नोंद करून save करून येणाऱ्या फॉर्म वरील ok वर क्लिक केल्यानंतर पुन्हा माहितीमध्ये बदल करता येणार नाही.
७. ज्या उमेदवारांनी यापूर्वी जून २०१९ मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना लॉगिन उपलब्ध होणार नाही.
८. वरील क्र २ ते ३ मधील उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याचा शेवटचा दिनांक ३१/८/२०२० आहे.
९. प्राधान्यक्रम लॉक करताना काही अडचण येत असल्यास edupavitra@gmail.com वर ई-मेल करावा.
-------*******-------
दिनांक :- ०४/०८/२०२०
पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरती बाबतची सद्यस्थिती
१. पवित्र प्रणालीअंतर्गत दि ०९/८/२०१९ रोजी शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सुधारित यादी दि ३/१२/२०१९, उर्दू माध्यमातील रिक्त पदांची यादी दि.२७/१२/२०१९ व मा उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिकेतील आदेशानुसार मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी संस्थातील इ. ९ वी ते इ. १० वी, इ.११ वी ते इ. १२ वी या गटातील सुधारित यादी दि. ७/२/२०२० रोजी प्रसिद्ध केलेली आहे.
२. पवित्र प्रणालीअंतर्गत मा. उच्च न्यायालयातील याचिकेतील आदेशानुसार समांतर आरक्षणातील पात्र उमेदवारांची शिफारस यादी, दि ९/८/२०१९, दि ०३/१२/२०१९ व दि.०७/०२/२०२० रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर विषयनिहाय,प्रवर्गनिहाय रिक्त राहिलेल्या पदासाठी व यादीतील अपात्र,गैरहजर, रुजू न झालेले उमेदवारांच्या रिक्त राहिलेल्या पदासाठी पात्र उमेदवाराची शिफारस यादी तयार करणे, मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी संस्थातील पदासाठी मुलाखतीस पात्र उमेदवारांची शिफारस यादी तयार करणे प्रस्तावित आहे,
३. पवित्र प्रणालीअंतर्गत यापूर्वी नियुक्तीबाबत केलेल्या शिफारशीच्या विरोधात व शासनाच्या धोरणात्मक बाबींच्या विरोधात विविध विषयावर मा . उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यातील याचिका क्र २९५६/२०१९ मध्ये दि १४/५/२०२० रोजी मा. उच्च न्यायालयाने आदेश देऊन ब्रिज कोर्स उत्तीर्ण असण्याची अट रद्ध ठरविली आहे. मा. न्यायालयाचा सदरचा आदेश शासनाच्या प्रचलित कार्यपद्धतीशी विसंगत असल्याने विधिज्ञाचे मत घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे.
४. मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह शिक्षक पदभरतीबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यापूर्वी दि. २३/३/२०२० रोजीच्या सूचनेनुसार सूचित करण्यात आलेले होते. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक परिस्थितीमुळे शासनाच्या दि ४/५/२०२० च्या शासन निर्णयानुसार पवित्र प्रणालीअंतर्गत पद भरतीसाठीची कार्यवाही स्थगित ठेवली आहे. तथापि पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्याची परवानगी देण्याबाबत शासनास विनंती करण्यात आलेली आहे.
५. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र ४०७९/२०१९ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळातील उच्च माध्यमिक पदाकरीता पदव्युतर पदवी साठी किमान व्दितीय श्रेणी व माध्यमिक पदांकरीता पदवीसाठी किमान उत्तीर्ण श्रेणी आवश्यक ठरविली आहे. यापूर्वी अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध होत नव्हते. मा . उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा मुलाखतीशिवाय पदभरतीसाठीच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध करून देऊन दि ०७/२/२०२० रोजी सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे मुलाखतीसह पदभरतीची परवानगी शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. तथापि त्यापूर्वी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्याबाबत सुविधा देण्यात येईल.